नागपूर
20-03-2023 14:56:03
Mission Maharashtra
नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन*
नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन*
*नागपूर ,२०*: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या निमित्ताने आगमन झाले.
विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करताच डॉ. सत्यार्थी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. आणि सी-20 परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी डॉ. सत्यार्थी यांचे स्वागत केले.
आजपासून जी-20 परिषदे अंतर्ग होत असलेल्या सी-20 परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. सत्यार्थी
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.