नागपूर
29-06-2024 16:38:48
Mission Maharashtra
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार, दि. ३० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.*
खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.