नागपूर
22-09-2023 17:57:20
Mission Maharashtra
गुणवंत सोनटक्के यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती
नागपूर :(दि. २२ सप्टेंबर २०२३) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते गुणवंत विठ्ठलराव सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबीरे यांनी केली.
गुणवंत सोनटक्के हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून त्यांनी यापूर्वी युवा बुद्ध भीम मैत्रेय एकता संघाचे अध्यक्षपद, गगन मलिक फाउंडेशन कोर कमिटी सदस्य तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांमध्ये ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.