विशाल जनसुमदायाच्या साक्षीने बावनकुळेंचे नामांकन दाखल
★ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती
नागपूर : ( दि. २९.१०.२०२४ ) कामठी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी-महायुती अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सर्व महत्वाचे नेते यांच्यासह कामठी विधानसभा क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपस्थित होता.
कामठी विधानसभा क्षेत्राची सेवा करण्यासाठी भाजपाने संधी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचे आभार व्यक्त करून बावनकुळे म्हणाले की, कामठी शहर आता मेट्रो शहर होत असून कामठी विधानसभा क्षेत्रातील सर्व समाजाचे लोक भाजपाच्या मागे उभे राहतील. कामठीचे नाव पूर्वी संवेदनशील क्षेत्रात होते. आता कामठीची ओळख शांततेसाठी जगभरात ओळखले जाते. या भागात विकासाची कामे करण्याचे काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा असेही आवाहन करुन जनतेच्या विकासासाठी काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
केदारांना कार्यकर्त्यांवर अविश्वास!*
श्री बावनकुळे म्हणाले की, सुनील केदार यांनी एकही कार्यकर्ता असा तयार केला नाही, ज्याला उमेदवारी देऊ शकत नाही. त्यांना कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. केदारांनी २५ वर्षांच्या राजकारणात एकही कार्यकर्ता तयार करू शकले नाहीत. मी असतो तर लहानशा कार्यकर्त्याला निवडून आणत आमदार केले असते. कामठी मध्ये लहानसा कार्यकर्ता कमळावर उभा झाला तरी तो निवडून येऊ शकतो, अशी ताकद भाजपाची आहे. येत्या काळात जिल्हा परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यावेळी कार्यकर्ते लढणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले. समारोपाच्या सभेत आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांचीही भाषणे झाली, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
* *बावनकुळे साहेब आगे बढ़ो..!*
नामांकन दाखल करण्यापूर्वी कामठी येथे पोहचून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आणि त्यानंतर सजवलेल्या रथातून भव्य रॅलीला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण कामठीचा परिसर दुमदुमत होता. "वारे कमल आ गया कमल", "बावनकुळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं" या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर कार्यकर्ते उत्साहाने नाचत होते, तर लाडक्या भगिनींनी भगवा आणि निळा दुपट्टा परिधान करून या उत्सवात आपला सहभाग नोंदवला.
आशीर्वाद रॅलीमध्ये लोकनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. टेकचंद सावरकर, आ. आशिष जयस्वाल, शिवसेना आमदार कृपाल तुमाने, बरिएमंच्या नेत्या माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान, रामटेक लोकसभा प्रमुख अरविंद गजभिये, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अनुराधाताई अमीन, नागपूर जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष नरेश मोटघरे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुजरकर, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, जिल्हा परिषद सदस्य राधाताई अग्रवाल, कामठी विधानसभा प्रमुख अजय बोढारे, कामठी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश रडके, मनीष वाजपेयी, गज्जू यादव, अजय कदम, अल्पेश आर्य, रमेश चिकटे, कमलाकर घाटोळे, अजय अग्रवाल, राज हाडोती, माधुरी पालीवाल, सुनील कोढे, चांगो तिजारे, राजेश रंगारी, भगवान मेंढे, कैलास बरबटे, कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, उपसरपंच आशिष राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.