विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या परिवर्तनाची संधी
चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
* नागपूर ग्रामीण तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद
नागपूर ( दि. ४ नोव्हेंबर २०२४ ) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माझ्या किंवा इतर कोणत्याही उमेदवाराच्या नशीबाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवणारी आहे. मला खात्री आहे,महाराष्ट्राची जनता साथ देईल आणि विकास करण्यासाठी महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
रविवारी ते नागपूर ग्रामीण तालुक्यात निवडणूक प्रचार दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील कापसी पंचायत समिती, बहादूर नगरपंचायत, नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नरसाळा आणि हुडकेश्वर, बेसा पिपळा नगरपंचायत येथील पिपळा व बेलतरोडी, खापरी पुनर्वसन तसेच जामठा पंचायत समिती क्षेत्रातील नागरिकांशी व भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या व दिवाळी मिलन कार्यक्रमात हजेरी लावली.
बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आदिवासी, मागासवर्गीय आणि इतर समाजांसाठी चालविलेल्या 58 योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, देशातील आणि राज्यातील महायुतीची डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग मोकळा करत आहे. येत्या 20 तारखेच्या निवडणुकीत विचारपूर्वक केलेले मतदान महाराष्ट्राचे भाग्य बदलवू शकते. एक चुकीचे मत केंद्रातील मोदी सरकारच्या योजना आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या योजना बंद होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तर एक योग्य मत अडीच कोटी लाडक्या बहिणींना वर्षाला 18 हजार आणि 45 लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफी करण्यासाठी सहाय्यक ठरेल.
निवडणूक प्रचार दौऱ्यात आ. टेकचंद सावरकर, अनिल निधान, अजय बोढारे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुजरकर, पंचायत समिती सदस्य शुभांगी गायधने, सरपंच सूरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, सचिन घोडे, सलीम शेख, ममता बांगडे, संध्या पिल्लारे, नंदा ढोरे, संदीप पारधी, रामराज तिवारी, भगत डहारे, अरुण खुटेल, राजमनी शाहू, देवराज पांडे, सुधाकर काटेकर, देवराव ठवकर, सुनील कोढे, राजेंद्र राजूरकर, नरेश भोयर प्रभू भेंडे, सुरेश पवनीकर, प्रशांत गणोरकर, वैशाली भोयर, डी. डी. सोनटक्के, भगवान मेंढे, संकेत बावनकुळे, प्रीती मानमोडे, कमलाकर रोडे, मीना शेंडे, पूजा धांडे, भागवत मेश्राम, पप्पू राऊत, सचिन घोडमारे, सुरज पाटील, अक्षय रामटेके, स्नेहा पारधी, संध्या पिल्लारे, नीरज द्विवेदी, राजकुमार वंजारी, एजाज घानिवाले, नितीन शेळके यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते