विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल वा २४ वा वर्धापन दिन २७ ला
★ "ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल" २७ व २८ ला
नागपूर : (दि.२२ नोव्हेंबर २०२३) कार्तीक पौणिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिना निमित्त दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीष्ट फेलोशिप असोसिएशन व निधिरेन-शु सोनेनजी विहायवे प्रमुख वंदनीय पुज्य भदन्त निवियु (कानसेन) गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना संपन्न होणार आहे या विशेष बुध्द वंदनेला जपान येथील जवळपास ३० बुध्द विहारांचे प्रमुख भिक्खु संघाचा सुध्दा सहभागी राहणार असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.
उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ४ वर्षा पासुन जपान येथील पुजनीय भिवस्खु संघ ड्रॅगन पॅलेसच्या वर्धापन दिनी उपस्थित राहु शकले नाहीत, परंतु या वर्षीं ड्रॅगन पॅलेसच्या २४ च्या वर्धापन दिना निमित्त जपान येथील पुजनीय भिक्खु संघाच्या उपस्थितीत विशेष युध्द वंदना होण्यावा आनंद ट्रॅगन पॅलेसच्या प्रमुख अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा सोमवार २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी, असे दोन दिवसीय, ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल चे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे या ट्रॅगन पॅलेस फेस्टीवल मध्ये विविध धार्मीक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश राहणार आहे.
ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता संपन्न होणार आहे. या प्रसंगी भारत सस्कार चे रस्ते वाहतुक व सडक परिवहण मंत्री मा. ना. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मास्य व्यवसाय मंत्री, मा. ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
ट्रॅगन पॅलेस फेस्टीवल च्या निमित्ताने विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक कलावंतांना विविध प्रबोधनपर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याकरिता पैलेस फेस्टीवल चा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे
ट्रॅगन पॅलेस फेस्टीवल अंतर्गत मुंबई येथील इंडीयन आयडल पेग, राहुल सक्सेना तसेच सारे गम पेग राहुल भोसले, याचे 'बुध्द ही बुष्द' या गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन २७ नोन्हेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता करण्यात आले आहे तसेच मंगळवार दिनांक २८ नोव्हेंब २०२३ रोजी सायंकाळी ५:०० ते ७:०० दरम्यान मुंबई बैंड व म्युजीक मेडीटेशनवे सादरीकरण संतो सावंत व संव करणार आहेत. सायंकाळी ७:०० वाजता प्रसिध्द गायक अभिजीत कोसंची व प्रसन्नजीत कोसंबी यांचे प्रबोधनपर बुध्द व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे
ड्रॅगन पॅलेस परिसरात फूड कोर्ट (Food Court) चे उद्घाटन
ड्रॅगन पॅलेस परिसरात १५ हजार स्क्वेअर फीट असलेल्या भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या 'फुड कोर्ट (Food Court) पे उद्घाटन ड्रेभन पॅलेसच्या २४ व्या वर्धापन दिना निमित्त करण्यात येणार आहे या फुड कोर्ट वे उद्द्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ, हस्ते सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी दुपारी १.३० वाजता संपन्न होईल. या 'फुड कोर्ट' वे अप्रतिम आर्कटिक्चर डिझाईन सुप्रसिध्द आर्कटिवट श्री. हबीब खान यांनी केले असुन श्री. दिलीप मसे यांनी स्ट्रक्चरल डिझाईन केलेले आहे या फुड कोर्ट च्या बांधकामाकरिता १५ हुन अधिक Agencies ने आपले योगदान दिलेले आहे. सामाजिक न्याय विभाग यांच्या अर्थ सहास्यातुन या अप्रतिम अश्या 'फुड कोर्ट' ची निर्मीती करण्यात आलेली आहे. लाखोच्या संख्येनी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला भेट देणा-या भाविकांना या 'फुड कोर्ट च्या माध्यमातुन विविध व्यंजनांवा आस्वाद घेता येईल असे मत ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले
ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल निमित्त प्रदर्शनीचे आयोजन
'ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल' च्या निमित्ताने दिनांक २७ व २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शनीचे आयोजन ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात करण्यात आले आहे हि प्रदर्शनी सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत लोकांकरिता उपलब्ध राहिल लघु सुक्ष्म व मध्यम विभाग, स्वादी ग्राम उद्योग, हातमाग विभाग वस्त्रोद्योग, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व इतर संस्थांवा या प्रदर्शनीमध्ये सहभाग राहणार आहे.
दोन दिवसीय 'ड्रॅगन पॅलेस फेस्टीवलला यशस्वी करण्याकरिता ड्रॅगन पॅलेस, ओगावा सोसायटी, हरदास विद्यालय, ड्रैगन इंटरनॅशनल स्कुल, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, डॉ बाबासाहेव आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र व इतर सामाजिक संस्थेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद, धम्मसेवक धम्मसेविका है अथक परिश्रम घेत आहेत. ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल च्या दोन दिवसीय विविध धामीक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आव्हान ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.