चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार अर्ज*
नागपूर: (दि. २९ ऑक्टोंबर २०२४ ) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवार २९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता असंख्य कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तेथून सकाळी १०.४० वाजता रॅलीला सुरुवात होईल. सकाळी ११.३० वाजता कामठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. ते सकाळी कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी तीन वेळा कामठी विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी विधानसभा निवडणूक आहे. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष असा बावनकुळे यांचा राजकीय प्रवास आहे. दरम्यान ते २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचे ऊर्जा तसेच उत्पादन शुल्क मंत्री व नागपूरचे पालकमंत्रीही होते.