अत्याचारी नराधाम प्रफुल्लला पोलिस कोठडी
नागपूर: ( २० ऑक्टोबर २०२३ ) अभियांत्रिकेच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रफुल्ल पराते असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी प्रफुल्ल हा बुटीबोरीच्या ब्राम्हणी परिसरातील रहिवासी आहे. काही दिवसांपासून तो हिंगणाच्या गोंडवाना परिसरात रहात होता. ४ ऑक्टोबरला त्याने जामठा परिसरातील जंगलात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वी त्याने बेलतरोडीमध्येही एका महिलेची छेड काढली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
बुधवारी पीडितेने नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत आरोपीची ओळख परेड करून घेत प्रफुल्लला ओळखले. पोलिसांनी त्याला मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले.
विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण
न्यायालयाला आजच त्याच्या कोठडीवर सुनावणी करण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने प्रफुलला ६ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.