*मी नागरिकांसाठी 24x7 उपलब्ध, म्हणून जनतेचा माझ्यावर प्रेमः विकास ठाकरे*
- *इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी भिडले ठाकरेंच्या प्रचारात*
*नागपूर, ता. ७ एप्रिलः* नागरिकांना अडचण आल्यास त्यांना त्याच्या नेत्यापर्यंत पोहोचता आले पाहीजे. त्यांच्या समस्या ऐकून घेणारा प्रतिनीधी नागरिकांना हवा आहे. माझे चार दशकांपासून नागपूरच्या नागरिकांशी घट्ट नाते आहे. मी नागरिकांसाठी 24x7 उपलब्ध आहे. म्हणून जनतेचा माझ्यावर प्रेम असून जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होताना बघून आनंद होत असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी केले.
रविवारी सकाळी पश्चिम नागपुरात आयोजित जनआशीर्वाद यात्रेत ते बोलत होते. रविवारी सकाळी रेशीमबाग चौक येथील गुरुदेव नगर येथे नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर जरीपटका येथील दयानंद पार्कमध्ये नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे यांच्या निवास्थानी सचिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपण एकत्र पूर्ण ताकदीने लढू असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सेंट विन्सेंट पलोटी चर्च येथे नागरिकांशी भेट घेऊन नागरिकांशी चर्चा केली. देशातील विविधतेतील एकता टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून सर्व धर्मियांचा सन्मान करणारी आमची विचारधारा असल्याचे यावेळी नागरिकांना सांगितले. चर्च येथील चर्च परिसरातही नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.