गोंडेगावाचे स्थलांतरण होऊन न्यू गोंडेगाव येथे नागरिकांचे पुनर्वसन
★ विविध समस्यांवर तोड़गा काढण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्यासह आ. आशिष जयस्वाल यांनी बैठक घेतली.
रामटेक : ( दि. ६ मार्च २०२४ ) पारशिवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कंपनीच्या कोळशाच्या खाणीमुळे गोंडेगाव या गावाचे स्थलांतरण होऊन न्यू गोंडेगाव येथे नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन प्रक्रिया ८ ते ९ वर्षापासून सूरु असून देखील वेकोली मार्फ़त अनेक महत्वपूर्ण विषयांवर कुठलिही कार्यवाही करण्यात आल्या नसल्याने ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपुर येथे गोंडेगाव पुनर्वसन येथिल विविध समस्यांवर तोड़गा काढण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्यासह आ. आशिष जयस्वाल यांनी बैठक घेतली.
या बैठकीत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड गोंडगाव अधिग्रहण व पुनर्वसन अंतर्गत २०१२ च्या R & R Policy अंतर्गत समाभुत सर्व विकासाची कामे पूर्ण करून देणे, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ने एकूण २१.६६ हेक्टर आर जमीन पुनर्वसित न्यु गोंडेगावला उपलब्ध करून देणे व राज्य शासनाव्दारे अधिसुचना काढून देणे. त्याचप्रमाणे राजस्व विभागाव्दारे ७/१२ वर नोंद करून ग्राम पंचायतला मिळवून देणे., गोंडेगावचे सर्व नागरिक यांची प्रकल्पग्रस्त म्हणुन नोंद करण्यात आली आहे. अशा सर्व नागरिकांना प्रकल्पग्रस्त नारिकांना प्रमाणपत्र देणे शिल्लक आहे त्यांना घराचा पट्टा व नोकरी देणे, सन १९९४ पासुन वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने संपादित केलेल्या शेतजमीन धारक प्रकल्पग्रस्तांना आज पर्यंत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडनी नोकरी दिली नाही. अश्या सर्व शेतकऱ्यांना R & R Policy अंतर्गत न्याय मिळवून देणे, पटवारी हल्का नं. १२ येथील ब्लास्टींगमुळे शेतकरी शेती करण्यास अक्षम आहे. अश्या उर्वरित शेतकऱ्यांची वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने संपादित करावी व तो पर्यंत त्यांना आर्थिक मोबदला नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कॉलोनीवर आम्ही कर आकारणी करून त्यांना कराबद्दल डिमांड दिले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पारशिवनी यांनी सुद्धा वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडला पत्र दिले आहे. असे (एकुण रु १० ते ११ लक्ष) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड वर थकीत आहे ते त्यांनी लवकरात- लवकर ग्राम पंचायतमध्ये जमा करावे, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने स्वतः कबूल केले आहे. की, न्यु गोडगावची पुनर्वसनची प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली व २० टक्के बाकी आहे. त्यानुसार ग्राम पंचायतला न्यु गोंडेगावचे संपादन झाल्यामुळे व न्यु गोंडेगाव ग्राम पंचायतला हस्तांतरण न झाल्यामुळे वीज वितरण कंपनीचे थकीत बिल जवळ रु ३१,००,०००/- (एकतीस लक्ष रु) भरण्याची जवाबदारी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची असून हे बिल त्यांनी भरावे, न्यु गोंडेगाव व गोंडेगावातील बेरोजगार युवक व महिलांना वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये कार्यरत खाजगी कंपन्यात रोजगारव्दारे व त्यांना सामावुन घेण्यात यावे, गोंडेगावात राहलेल्या उर्वरित लोकांना आजच्या बाजार भावाप्रमाणे मोबदला मिळवून द्यावा. जेणे करून त्यांना पट्टा मिळाल्यानंतर घर बांधकाम व आर्थिक उत्पन्न निर्माण होण्यास सवलत होईल, न्यू गोंडेगाव येथे खातेदारास खाली जागा देण्यात आली. त्यांचे जुन्या गोंडेगाव येथील घर वेकोली च्या ब्लास्टींग मुळे पूर्णपणे पडलेली होती. त्यांना राहावयास घर नसल्यामुळे घराचे बांधकाम करणे आवश्यक होते. त्यांचे NMRDA अंतर्गत घरकुल मंजूर असल्यामुळे संबंधीत घरकुल लाभार्थीने कर्ज व उसनवार पैसे घेवून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. परंतु घेतलेले कर्ज व घेतलेली उसनवाराची परतफेड करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील दर्शविलेल्या १७ घरकुल लाभधारकांना शासकिय अनुदान देण्यात यावे, अशा अनेक महत्वांच्या मुद्दांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली व काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत गोंडेगाव सरपंच - सौ. मनीषा अशोक दलाल, जिवलग पाटील, शरद राऊत, नागपूर एरिया जनरल मॅनेजर, सुनिल कुमार एरिया प्लॅनिंग ऑफिसर श्री.मुखर्जी, WCL हेडकॉटर चे श्री. पंजवानी, श्री.वर्मा, एरिया रेव्हेन्यू ऑफिसर श्री. जामगडे, श्री. विमल शर्मा, ग्राम पंचायत सदस्य कृणाल मधुमटके, कविता राऊत, रुपाली फरकाडे, प्रितम राऊत, पुजा राशेगावकर, साहिल गजभिये, दिपक अरुरकर उपस्थित होते.