निमखेडा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
रामटेक ( दि. १२ मे २०२४ ) मौदा तालुक्यातील निमखेडा येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत अॅड. आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण-२०४ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२६ व चष्मे करिता-१७८ लाभार्थी यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाला उपसभापती शज्ञानेश्वर चौरे, उपसरपंच विनायक महादूले, लालेनद लांजेवार, अर्चनाताई लांजेवार, चिंन्नाराव येमुरी, गिरीधर दारोडे, विनायक घाटबांधे, गोविंदा नागरीकर, श्रीनुजी यागटी, मनोज झाडे, निखिल कडू तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे. यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे. याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि, रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.