चक्रवती फाउंडेशनचा बुद्ध जयंतीनिमित्त २५८६ किलो ची खिर बनवून विश्वविक्रम करण्याचा संकल्प
नागपूर; ( दि. २२ में २०२४ ) चक्रवर्ती फाऊंडेशन, भीम वादळ नागपूर शहरातर्फ दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तथागत गौतम यांची २५८६ बुद्ध जयंती चा कार्यक्रम बेझनबाग येथील ग्राउंड वर साजरा करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम जागतिक स्तरावरचा असून. यावर्षी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती २३ मे २०२४ ला २५८६ वी बुद्ध जयंती असल्यामुळे २५८६ किलो ची खिर बनवून विश्वविक्रम करण्याचा संकल्प आयोजन समितीने घेतला आहे. विश्वातील अनेक बुद्ध जयंती पैकी ही जयंती सर्वांत वेगळ्या स्वरूपाची असून या जयंती मध्ये २५८६ किलो ची खीर बनवली जाणार आहे. तसेच या जयंतीमध्ये २४ तासांचा महापरित्रणपाठ बेझनबाग ग्राऊंडवर होणार आहे. ज्यामध्ये बौद्ध धर्मातील सर्व सुत्ताचे पठण भिक्खू संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. या महापरित्राण पाठ मध्ये ५०० बौद्ध भिक्खूचा सहभाग राहणार असून महाराष्ट्रातील विविध बौद्ध विहारातून बौद्ध भिक्खू येणार आहेत. तसेच बौद्ध उपासक व उपासिका सहभागी होतील.
या जयंतीमध्ये नागपूर शहरातील बौद्ध उपासक व लहान बालके बौद्ध संस्काराचे शिक्षण दर रविवारी आपल्या आपल्या विहारात आचरण करण्याचा सामुहिक संकल्प घेतला जाणार आहे. हा विश्वविक्रम व उपक्रम नागपूर शहरात प्रथम होणार आहे.या विश्वविक्रम सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रमुख प्रतिक इंदूरकर असून या आयोजन समितीत गणेश चाचेरकर, भीम वादळ, जितु बनसोड, रविंद्र ठवरे, राकेश निकोसे, बाबु खान, निखिल वानखेडे, राज डोंगरे, उद्देश भिवगडे, संजिवनी सखी मंच, मानव अधिकार संरक्षण मंच, अंकित राऊत इत्यादी समितीचे सदस्य उपस्थित होते.