जनकल्याणाच्या कामाची सुरुवात करा*
★बावनकुळे यांनी दिल्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा
कोराडी: ( दि.७ नोव्होंबर.२०२३) ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा समर्थित सरपंचांना केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांमधून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही संधी दडवू नका व गरीब आणि वंचित समाजाची सेवा करण्यासाठी पदाचा वापर करा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपूर जिल्ह्यात २६५ भाजपा समर्थित सरपंच विजयी झाले. या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले.
कोराडी येथील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी भेट घेतली. त्यावेळी ते सरपंचांना शुभेच्छा देत होते. नागपूर जिल्ह्यात २२४ सरपंच ११० पेक्षा जास्त ग्राम पंचायत सदस्य येऊन भेटेल. जिल्ह्यातील अनेक सरपंच भाजप ला समर्थन देण्यासाठी श्री बावनकुळे यांची भेट घेतली. एकमेकांना लाडू भरवून भाजपा समर्थित सरपंचांनी एकमेकांसोबत आनंद साजरा केला. नागपूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपा समर्थित सरपंच व सदस्य पदांचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे सरकारची कामे व जनकल्याणाच्या योजना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहचत असून त्याचमुळे हा विजय मिळविता आला. या विजयाचे श्रेय तळागात काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आहे.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ. आशिष देशमुख, नागपूर जिल्हा ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, रामटेक लोकसभा निवडणूक प्रभारी अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, अनिल निधान, भाजयुमो अध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहित पारवे, चरणसिंग ठाकूर, अजय बोढारे, अनुराधा अमीन, नरेश मोटघरे, अशोक धोटे, सदानंद निमकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य उपस्थित होते.