इंदोऱ्यात एक परिवार एक पुष्पहार अर्पण अभियानाला प्रारंभ
नागपूर: उत्तर नागपूरातील इंदोरा चौकात असलेल्या प.पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला ३६५ दिवस एक परिवार एक पुष्पहार अर्पण संकल्प अभियान या संस्थेतर्फे आज बुधवार ७ जुन पासून पुतळा व पुतळया परिसरातील साफ सफाई करून प्रभागातील माजी नगरसेविका ममता सहारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून ३६५ दिवस एक परिवार एक पुष्पहार अर्पण अभियानाला प्रारंभ
करण्यात आला.
संपूर्ण भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरूषांचे पुतळे भरपूर प्रमाणात आहेत परंतु त्यांच्या जन्मदिनी व पुण्यतिथी व्यतिरिक्त इतर दिवशी त्या पुतळ्यांकडे कुणीही भटकत नाही व परिणामी पुतळा परिसरात हारतुरयांचा कचरा व इतर साहित्य तसेच पडून राहते. म्हणूनच 'एक परिवार एक पुष्पहार' या समितीची स्थापना करून भदन्त हर्षबोधी यांच्या नेतृत्वात वर्षभरापासून नागपूर येथील संविधान चौकात एक परिवार एक पुष्पहार अर्पण हा संकल्प अभियान राबविण्यात आला व त्याचाच एक भाग म्हणून उत्तर नागपूरातील इंदोरा चौकात असलेल्या प.पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला एक परिवार एक पुष्पहार अर्पण अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचार घराघरात पोहोचावे. प्रत्येक परिवाराने त्यांच्या त्यांच्या परिसरातील पुतळयाजवळ जावुन बाबासाहेबांना पुतळ्याजवळ जावुन बाबासाहेबांना पुष्पहार घालावे, परिसराची स्वच्छता आर्थिक' ठेवावी. दर रविवारी मान्यवर वक्तयांना बोलावुन महापुरूषांचे विचार समजुन घ्यावे, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून समाजात कार्य करावे, नविन पिढीला मार्गदर्शन करावे याच उदात्त हेतुने उपरोक्त अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. असे समितीचे अध्यक्ष भदन्त हर्षबोधी यांनी सांगितले. यावेळी प्रभागाच्या माजी नगरसेविका ममता सहारे, सुमन कानेकर, मणिषा भगत , तरूलता कांबळे, रेखा पाटील, ज्योति बेले, दमयंती रामटेके प्रमिला टेंभेंकर, त्रिवेणी पाटील, इंदीरा पाटील, मिरावंती बोधाटे, सुनंदा नगराळे, राजु रामटेके आदी उपस्थित होते.