पक्ष संघटनेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व द्या; माजी मंत्री रमेशचंद्र बंग
गुमगाव-सातगाव सर्कलच्या विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
नागपूर: ( दि. १० जुलैं २०२४ ) राजकारणात पक्षाचे संघटन आणि पक्षाने दिलेल्या आदेशाला महत्व देणे गरजेचे आहे. जर आपण पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत हातभार लावला आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले तर पक्ष सुद्धा कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो आणि त्यातूनच भविष्यातील नेतृत्वाची निर्मिती होते. असे प्रतिपादन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना केले. हिंगणा तालुक्यातील गुमगाव सातगाव जिल्हा परिषद सर्कल मधील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष योगेश सातपुते यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य रश्मी कोटगुले, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, सरपंच अरुण देवतळे, शोभा माहुरे,प स सदस्य सुनील बोंदाडे, पोर्णिमा दीक्षित, अनुसया सोनवणे, वैशाली काचोरे, विठ्ठलराव कोहाड, दिनेश ढेंगरे,विजय नंदनवार, पांडुरंग पाटील लोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शिवसेने चे विनोद कैकाडी , राजू गोखरे व त्यांचे शेकडो सहकारी, आरपीआय आठवले गटाचे प्रकाश कांबळे व त्यांचे सहकारी, तिलक नागपुरे, गोपीचंद कातकडी, नंदू कोसारे, सुरज तुमडाम शैलेश गिरडे व सहकारी, साहिल चिकनकर व सहकारी, अभय वाटकर व सहकारी, सचिन नागपुरे, यादवराव चकोले, सुभाष टोंगे, शुभम बाळबुदे, सुरज गावंडे, भाजपचे ग्रामपंचायत सदस्य पंकज मांढरे श्याम दुर्गे, चैनिलाल उपरीकर, सुरज गावंडे यांच्यासह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सर्व प्रवेशितांचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांनी पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष योगेश सातपुते यांनी, सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे यांनी तर आभार दिनेश बंग यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर धामंदे, शैलेश नागपुरे, शत्रुघन आवारी, चंदू नागपुरे, अरुण भोयर, कमलाकर कुरणकर, शेखर गायकवाड, मयूर पेंदाम, तक्षक गुलकुंडे, शातिश भोंडगे, तेजराम ढवळे, पंकज ढोले, विजय लकडे, यांच्यासह गुमगाव सातगाव जिल्हा परिषद सर्कलच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.