नागपूर
01-05-2023 16:56:48
Mission Maharashtra
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
नागपूर, दि.01 : महाराष्ट्राच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ध्वजारोहण केले. तद्नंतर पोलीस पथकाने जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली.
अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.