अमृतमहोत्सवा निमित्ताने जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची होणार निर्मिती
नागपूर: ( दि. २५ में २०२३ ) उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक भेळसावत असते आणि पावसाळ्यात मात्र ती समस्या कमी होते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी भारत सरकारच्या आदेशाने अमृत सरोवर योजना अंमलात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बंडू सय्याम यांनी दिली.
जिल्ह्यात १० हजार घन मीटर खोदकाम करून त्यात १० दशलक्ष घन मीटर पाणी मावेल अशा क्षमतेचे अमृत सरोवर तयार केले जाणार आहे. रामटेक, नरखेड, पारशिवनी, कळमेश्वर, सावनेर, कुही, मौदा, उमरेड, भिवापूर हिंगणा, काटोल तालुक्यात अमृत सरोवर तयार केले जाणार आहेत. अमृत सरोवर तयार झाल्यानंतर सिंचनाला त्याचा लाभ होईल. जमिनीतील जलस्तर उंचावेल. विहिरीची पाणी पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले. म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. याअनुषंगाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर तयार केले जाणार आहे, हे विशेष.
एक एकर जागेवर अमृत सरोवर खोदले जाईल. त्यामाध्यमाने १० हजार क्युबिक मीटर पाणी साठा होईल. ही जागा संबंधित ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा घेऊन ठरविली जाणार आहे. त्यानुसार काम केले जाईल. दरम्यान, देशभरात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ५० हजार अमृत सरोवर खोदण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्याचेच पालन आम्ही करीत आहोत, असेही जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेवटी, आस धरा, कास धरा, पाणी बचतीचा ध्यास धरा हाही मंत्र यामाध्यमाने शेतकऱ्याना, सर्वसामान्यांना सांगितला जाणार