अड्याळ येथे विपश्यना केंद्राचे होणार भुमीपुजन आज
आंतरराष्ट्रीय भन्तेजी व राज्यातील दिग्गजांची राहणार उपस्थिती
चंद्रपूर : ( दि. १८ ऑगस्ट २०२४ ) ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ जाणी येथे सर्व समाजबांधवांसाठी ४५ कोटी रुपयांच्या मंजूर निधीतुन विपश्यना केंद्राच्या बांधकामाचे भुमीपुजन व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती स्थापना जागेचा भुमीपुजन कार्यक्रम व तथागत गौतम बुद्ध यांच्या ५१ मुर्त्यांच्या वितरण कार्यक्रम सोहळा आज १८ ऑगस्ट रोजी दु. १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून थाईलंड येथील वाट साकेत धम्म स्कुल राॅयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ. फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा. फ्रामाहा सुपाचै सुयानो हे राहणार आहेत. तर मुख्य अतिथी म्हणून खा. वर्षा गायकवाड, खा. प्रणिती शिंदे, खा. बलवंत वानखेडे, खा. नामदेव किरसान, खा. शिवाजीराव काळगे, खा. श्याम बर्वे, कॅप्टन नटिकेट थाईलंड, सिने अभिनेता गगन मलिक, काॅंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची उपस्थिती राहणार आहेत.
सोबतच सकाळी १० ते १२ या वेळात सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा बुध्द-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली येथील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.