नागपूर
17-08-2024 20:51:42
Mission Maharashtra
नितीन गडकरींचा जनसंपर्क आज देशपांडे सभागृहात
नागपूर: ( दि. १८ ऑगस्ट २०२४ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या (रविवार) सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मंत्री महोदय फक्त नागपूर सुधार प्रन्यासशी (एनआयटी) संबंधित विषयांवरील निवेदने स्वीकारणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत ना. गडकरी सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात उपस्थित राहतील. यावेळी ते एनआयटीशी संबंधित समस्यांची सुनावणी करतील. जनसंपर्काला येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची निवेदने सुवाच्य अक्षरात लिहून आवश्यक त्या कागदपत्रांसह आणावीत. तसेच निवेदनाच्या तीन प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.