निर्मल अर्बन बँकेच्या २५ वर्षातील प्रगतीत ग्राहकांची महत्वपूर्ण भूमिका - पूजा प्रमोद मानमोडे
★ बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्ष आज
नागपूर : ( दि.२६ मार्च २०२४ ) बँकेच्या जडणघडणीत जुळलेले ग्राहकांचे नाते जपले असल्यामुळेच बँकेची विश्वसनीयता कायम ठेवल्यामुळे आज बँक उत्तरोत्तर प्रगती करीत असल्याचे मत निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्षा कु.पूजा प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केले.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद मानमोडे यांनी २७ मार्च १९९९ ला स्थापन केलेली निर्मल अर्बन बँकेला त्यांचे नियमीत मार्गदर्शन लाभत आहे.बँकेची जानेवारी २०२३ मध्ये संचालक मंडळाची सार्वजनिक निवडणूक होऊन बँकेच्या युवा अध्यक्ष कु पूजा प्रमोद मानमोडे यांची २०२३ ते २०२८ पर्यंत ५ वर्षासाठी अविरोध निवड झाली.त्यांना सहकार विभागातून सहाय्यक निबंधक पदावरून निवृत्त झालेले श्री तुकाराम चव्हाण यांची उपाध्यक्ष पदी अविरोध निवड होऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाला त्यांची बँकेच्या कामकाजात साथ मिळाली आहे.
कु. पूजा मानमोडे यांनी विविध वर्गातील ग्राहकांकरिता ठेवी व कर्ज देण्याच्या अभिनव योजना आखलेल्या आहेत.प्रामुख्याने महिला वर्ग, शाळेत जाणारे पाल्य,जेष्ठ नागरिक यांचे साठी व्याजदरात सवालती दिल्या आहेत.