शासकीय योजनांचा गरजू विद्यार्थ्यांनाच फायदा व्हावा: प्रभाकर दुपारे
नागपूर:( दि. ९ जुलैं २०२४ ) सहारा मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळेचा २३ वा वर्धापन दिन सोहळा भगवान नगर येथे शाळेच्या पटागंणात मोठ्या साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून त्रिलक पत्रकार भवनचे व्यवस्थापक व सेवानिवृत्त उपसंपादक प्रभाकर दुपारे, समाजसेवी नारायण चिंचोणे माजी नगरसेवक व संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंडे, संजय नितनवरे, नागसेन लभाने, नितेश भोयर, सुनील सुटे, पंकज चहांदे, अविनाश सुटे, संस्थेच्या मातोश्री मोना चांदेकर, संस्था सचिव मनिष चांदेकर, शाळा प्रमूख शोभा केणे, सरला राउत, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर दुपारे यांनी सांगितले की, खरी गरज हि कुणाला आहे ? ज्यांना आहे त्यांना मिळत नसून समाजातील विद्रूप लोक याचा फायदा घेत असून, अशा चांगल्या काम करणाऱ्या शाळांना त्यापासून वंचित ठेवले जाते मग ते वेतन किंवा शाळा चालविण्याकरिता अनुदान असो. पण त्यावर सुद्धा मात करून ही शाळा गेली २२ वर्षे अविरत कार्य करत आहे. सहारा मतिमंद मुलांची शाळा ही खरोखरच दिव्यांग मुलांची सेवा करते व त्यांना समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही शाळा निरंतर करीत आहे या शाळेचे व संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्याजोगे आहे तसेच नारायण चिंचोणे यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात शाळेचे कौतुक करून शाळे करीता आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व भविष्यात या शाळेचे स्वरूप मोठे व्हावे याकरिता मदत करण्याचे आश्वासन देऊन मुलांना गणवेश व खाऊ वाटप केले. कार्यक्रम स्थळी संस्था सचिव मनिष चांदेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले व संचालन लोकेश चोले यांनी केले.