नागपूर
29-06-2023 13:48:39
Mission Maharashtra
घराला कुलूप लावून जाणे पडले महागात
नागपूर येथील यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लाट नंबर ७३, संघर्ष नगर, टिपू सुलतान चौक पिवळी नदी येथील शोएब अफरोज वल्द मोहम्मद सब्बीर (वय ३०) यांना घराला कुलूप लावून जाणे चांगलेच महागात पडले.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून पहिल्या माळ्याये कुलुप तोडून बेडरूममधील लाकडी लॉकरमधून सोने- चांदीचे दागीने व नगदी ४० हजार रूपये असा एकूण १ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी यशोधरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास यशोधरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक एस. ई. बारगळ करीत आहे.