लकडगंज पोलिस संकुलाचे आज आभासी लोकार्पण
नागपूर, (११ मे) पोलिस उपायुक्त कार्यालय, लकडगंज पोलिस ठाणे इमारत, ३४८ पोलिस निवासस्थाने संकुल, कामठीच्या ५२ निवासस्थानांचे लोकार्पण तसेच पारडी पोलिस ठाण्याचा भूमिपूजन सोहळा आभासी पद्धतीने शुक्रवार, १२ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता लकडगंज पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.
लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. खा. कृपाल तुमाने, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. नितीन राऊत, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस महासंचालक व पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप बिष्णोई प्रामुख्याने उपस्थित राहतील.
याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने आदींनी केले आहे.