आपला आमदार आपल्या गावी" उपक्रमा अंतर्गत पिपरीया गावाला आ. आशिष जयस्वाल यांची भेट
रामटेक; ( दि. १६ जुन २०२४ ) शासनाच्या विविध योजनांचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या गावी" या उपक्रमाच्या माध्यमातून १५ जुन रोजी रामटेक तालुक्यातील गट ग्राम पंचायत पिपरीया अंतर्गत पिपरीया गावाला भेट दिली.
यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांनी प्रथमतः गावकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या समज़ुन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
यावेळी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, गट विकास अधिकारी जयसिंग जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे, पोलिस निरिक्षक राजेश पाटील, माजी सभापती संजय नेवारे, ग्राम पंचायत सरपंच प्रविण उईके, माजी सरपंच शेखर खंडाते, उपसरपंच भिमराव वाळके, पोलिस पाटील कमल हिरकणे, रविंद्र उईके, ग्राम पंचायत सदस्य काजलताई धूर्वे, आचलताई कोडापे, शोभाताई डोंगरे, प्रितीताई उईके, सूर्यभान ईडपाची, अशोक उईके सह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.