वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत
नागपूर ( दि. १ ऑक्टोंबर २०२४ ) वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येत असून. यावर्षी वन्यजीव सप्ताहाचा विषय "वन्यजीव संरक्षणाच्या माध्यमातून सहअस्तित्व" असून या अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज नविन प्रशासकीय ईमारत (वन भवन) झिरो माईल येथे वन्यजीव सप्ताह चे उद्घाटन मानवी श्रृंखला तयार करुन वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर, श्रीलक्ष्मी ए. यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरूवात नविन प्रशासकीय ईमारत (वन भवन) झिरो माईल, नागपूर येथे करण्यात आली. यात विद्यार्थ्यांची मानवी श्रृंखला (Human Chain) नविन प्रशासकीय ईमारत (वन भवन) झिरो माईल, गर्व्हमेंट प्रेस सिव्हील लाईन, नागपूर ते फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन सीताबर्डी नागपूर पर्यंत तयार करण्यात आली. या मानवी श्रृंखला एकूण लांबी १.५ किमी होती. या कार्यक्रमात श्री. माथुरदास मोहता सायंस कॉलेज सक्करदरा नागपूर, डी.आर.वी. सिंधू कॉलेज, पाचपावली, नागपूर, रामदेवबाबा इंजिनिअरींग कॉलेज, नागपूर, इंन्स्टिट्युट ऑफ सायंस कॉलेज, नागपूर तसेच हिसलॉप कॉलेज, सिव्हील लाईन, नागपूर या महाविद्यालयांचा समावेश होता. या कार्यक्रमात एकूण ४०० विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मा. वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी विद्यार्थ्यांच्या हातात वन्यप्राणी वाघाची प्रतिकात्मक मूर्ती देवून Save Forest Save Wildlife अशा घोषणेने करण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वन्यजीवांचे माहिती फलक वितरीत करण्यात आले तसेच वने व वन्यजीवाबाबत माहिती देवून त्यांच्या संरक्षणार्थ घोषणा देण्यात आल्या, सदर कार्यक्रम प्रादेशिक वनविभाग, वन्यजीव वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडले. कार्यक्रमात डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, श्री. संदीप क्षीरसागर, सामाजीक वनीकरण, श्रीमती सोनल कामडी विभागीय वन अधिकारी, क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय नागपूर, श्रीमती रामेश्वरी भोंगाडे विभागीय वन अधिकारी तथा प्रसिद्धी व माहिती अधिकारी, नागपूर व मानद वन्यजीव रक्षक श्री. उधमसिंह यादव, श्री. अविनाश लोंढे, श्री. अजिंक्य भटकर, श्री. कुंदन हाते इत्यादी क्षेत्रिय वन अधिकारी, क्षेत्रिय वन कर्मचारी व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.