नदी स्वच्छता कार्य प्रगतीपथावर
दरवर्षी मनपातर्फे उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ - १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येते. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत वाढलेली हिरवळ, गवत तसेच गाळ काढुन नद्यांची रूंदी व खोली स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल.
नाग नदीची लांबी १७.४ किमी, पिवळी नदीची लांबी १६.४ आणि पोहरा नदीची लांबी १३.१२ किमी आहे. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबविण्यात येते. अभियानात गैर शासकीय संस्थांचे सुद्धा सहकार्य मिळते. शहरातील तिनही नद्यांसह सर्व नाल्यांची योग्य व व्यवस्थित स्वच्छता व्हावी याकडे प्राधान्याने लक्ष देउन विहित कालावधीमध्ये नदी स्वच्छता अभियान पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेणे, नदीमधून काढण्यात येणा-या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करणे, नदी मधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होउ नये याची काळजी घेणे या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देउन कार्यवाही करण्याचेही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.
असे होणार नदी स्चछता कार्य
नाग नदी
अंबाझरी तलाव ते पंचशील चौक (३.५ किमी)
पंचशील चौक ते अशोक चौक (२.६ किमी)
अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल (३.४ किमी)
सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल (भंडारा रोड) (२.४ किमी)
पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) (५.५ किमी)
पिवळी नदी
१. गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट (४.३ किमी)
२. मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पूल (५.१ किमी)
३. कामठी रोड पूल ते जुना कामठी रोड पूल (३.४ किमी)
४. जुना कामठी रोड पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) (३.६ किमी)
पोहरा नदी
१. सहकार नगर ते नरेंद्र नगर पूल (४.२ किमी)
२. नरेंद्र नगर ते पिपळा फाटा (४.५२ किमी)
३. पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव (४.४ किमी)