आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान - डॉ. नितीन राऊत* *दीक्षाभूमी आणि संविधान चौक येथे अभिवादन*
नागपूर :- शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केले
डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरातील संविधान चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर डॉ. राऊत यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे दर्शन घेऊन अभिवादन केले आणि नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
महिलांना शिक्षण, मतदानाचा, संपत्तीचा हक्क, प्रसुती रजेचा लाभ, कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना, भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना, सिंचन सोयींसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल, देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या, हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, ब्लॉक क्रमांक १४ चे अध्यक्ष दीपक खोब्रागडे, रेखा लांजेवार, निलेश खोब्रागडे, कल्पना द्रोणकर, रीना दरवाडे, चेतन तारारे, गौतम अंबादे, निशाद इंदूरकर, गीता श्रीवास, विजया हजारे, विश्वकुमार लांजेवार, सचिन डोहाणे, कृष्णा गजभिये, मुन्ना पटेल, इंद्रपाल वाघमारे, राजेश कोहाड, नथुजी रोकडे सह सैकडो काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.