कामठीवासींनी नि:स्वार्थ सेवेची व्यक्त केली कृतज्ञता!
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्या नागरिकांच्या गाठीभेटी
* नागरिकांच्या भेटी, संवादातून दिसली स्नेहाची साखळी
नागपूर,( दि. ४ नोव्हेंबर २०२४) आगळी-वेगळी संस्कृतीसह शांती, सद्भाव आणि आनंदायी वातावरणाची निर्मिती करण्यात लोकप्रतिनिधींचे महत्व अनन्यसाधारण आहे. अशी ओळख तयार करण्यासाठी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोलाची भूमिका बजावली असल्याची भावना सोमवारी कामठी शहरात दिसून आली. कामठी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी भेट दिली. नागरिकांचा स्नेह आणि आशीर्वाद घेतले. प्रत्येक घरात श्री बावनकुळे यांचे भावनिक शब्द, कृतज्ञतेची भावना आणि निःस्वार्थ सेवेची आकांक्षा स्पष्ट जाणवत होती.
कामठी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात कामठी शहरात नागरिकांशी संवाद साधला. कामठीचे ज्येष्ठ नागरिक श्री जयप्रकाश तिवारी यांच्या घरी भेट दिली. तिवारी कुटुंबीयांचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिवारी कुटुंबातील कन्या अर्चना तिवारी एमबीए शिक्षणासाठी अमेरिकेत जात असल्याची माहिती मिळताच श्री बावनकुळे यांनी आपुलकीने अर्चनाला तिच्या शिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली सोबतच आवश्यक मदत करण्याचा विश्वास दिला. त्यांच्या या आश्वासन दिले. त्यांच्या या वचनाने तिवारी परिवाराला दिलासा मिळाला आणि त्यांनी कृतज्ञतेने बावनकुळे यांना आशीर्वाद दिला. तिवारी कुटुंबासह अन्य परिवारांनीही त्यांना निवडणुकीत विजयाचा आशीर्वाद दिला, आणि या निवडणुकीत बावनकुळे यांचे एकात्म आणि सेवाभावी नेतृत्व कामठी शहरासाठी नवा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कामठी शहरातील त्यांचा निवडणूक प्रचार दौरा असला तरी राजकीय कृत्य नव्हे, तर समाजातील सर्व घटकांशी जोडलेली एक स्नेहाची साखळी असल्याचे चित्र दिसून आले. त्यांनी मोहनलालजी अग्रवाल, मेहरोलिया नागेशजी शुक्ला, दिनेश स्वामी चंदू लांजेवार, बबलू तिवारी, कपुर कनोजिया, सादफ, खान साहेब, खलील, उमेश मस्के, मनिष सराफ, विरेंद्र बोरकर, रमेश वैद्य, प्रमादे कातोरे, भोला सिंग बैस, रामकिशन खंडेलवाल यांच्या घरी भेटी दिल्या.
कामठीच्या गोराबाजार परिसरातून भेटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. त्यानंतर जुना गोदाम, मॉल रोड, भाजी मंडी, कोलसाटाल, पिली हवेली चौक, फुटाना ओली, सराफा बाजार, ओली नंबर २, तिलक नगर, गोयल टॉकीज, जुनी ओली, ओकांरेश्वर मंदिर, यादव नगर, हमालपुरा या भागात नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या या दौऱ्यात आ. टेकचंद सावरकर, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, अजय अग्रवाल, लाला खंडेलवाल, मनीष वाजपेयी, राज हाडोती, कपील गायधने, पंकज वर्मा, विजय कोंडुलवार, विवेक मंगतानी, आशू अवस्थी, संजय कनोहिया, कुणाल सोलंकी, अंश खंडेलवाल, लालू यादव, टिक्कू यादव, मंगेश यादव, गोपाल सिरीया, योगेश गायधने, सुनील मेश्राम, अजय कदम, वंदना भगत, दीपंकर गणवीर, अफजल अंसारी, दीपक सिरीया, उदास बंसोड, सुभाष सोमकुवर, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटील, तिलक गजभिये, मनोहर गणतीर, अशोक नगरारे, रेखा भावे, रजनी लिंगायत, नंदा गोडघाटे, रजनी गजभिये, रेवा पाटील, उषा भावे, विशाखा गेडाम, विष्णू ठवरे, चंद्रशेखर लांजेवार, राजेश शंभरकर, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, चंदू कापसे, महेंद्र मेंढे, नरेंद्र चव्हाण, सुशील तायडे, वंदना आळे, मंदा लोणारे, शशीकला मेश्राम, वंदना कांबळे, संगीता मानवटकर, भूमीका लोणारे, छाया फुलडोले, सुनीता पाटील, सुलभा बोस्कर, विमल लोणारे यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आज बावनकुळे यांचा कामठी तालका दौरा
मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी चंद्रशेखर बावनकुळे कामठी तालु्क्यात प्रचार दौरा करणार आहेत. या दरम्यान ते भेटी, संवाद तथा दिवाळी मिलन कार्यक्रमात उपस्थित राहतील. दुपारी12 वा. येरखेडा नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी कुसुमताई संगेवार सभागृहात संवाद साधणार आहेत. दुपारी एक वाजता गुमथळा पंचायत समिती क्षेत्रातील भोवरी येथे जिल्हा परिषद शाळे समोरील पटांगणात, दुपारी दोन वाजता महालगांव पंचायत समिती क्षेत्रातील शंतनू लॉन कढोली येथे, दुपारी चार वाजता वडोदा पंचायत समिती क्षेत्रातील मंगलमूर्ती लॉन, वडोदा येथे सायं. पाच वाजता तरोडी पंचायत समिती क्षेत्रातील श्री राधे वृध्दाश्रम फार्म खेडी येथे बिडगाव नगर पंचायत क्षेत्रातील देशमुख सभागृहात, तरोडी खुर्द येथील आनंद सागर लॉन, शिरपूर सह महादुला येथील यशवंत लॉन येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.