देवलापार येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे
रामटेक ( दि. २२ मार्च २०२४ ) आदिवासी भागातील नागरिकांना प्रशासकीय कामात मदत होण्यासाठी देवलापार येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी इमारतीची गरज होती. आमदार आशिष जयस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार सुमारे ९ कोटी मंजूर झाले आहेत. या निधीतून आता अप्पर तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे.
पैशाअभावी इमारतीचा प्रस्ताव रखडला होता. मात्र आता निधी आल्याने इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार आशिष जैस्वाल यांचे आभार मानले आहेत. आमदार जैस्वाल यांनी निधी मिळावा यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारंवार भेट घेतली. देवलापार येथील अतिरिक्त तहसील कार्यालयाचे महत्त्व पटवून दिले. अखेर त्यांनी याची दखल घेत निधी मंजूर करण्यास परवानगी दिली. या कामाला तातडीने सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार जयस्वाल यांनी दिली.