विकास ठाकरेच बनणार नागपूरचे खासदार, काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवूः मुकुल वासनिक*
• *ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नागपुरात*
*मध्य नागपूकमध्येही जन आशीर्वाद यात्रेला उदंड प्रतिसाद*
*नागपूर, ता. ६ एप्रिलः* नागपूरकरांच्या नस-नसात काँग्रेस असून नागपूर म्हणजचे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यंदा हा काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवणार आहोत. तसेच विकास ठाकरेच नागपूरचे खासदार बनणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सांगितले.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांच्या घराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अवैध आंदोलनावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, “जन सामान्यांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालली वाळू घसरली आहे. त्यामुळे असे कृत्य करण्यात येत आहे, मात्र यंदा विकास ठाकरेंचा विजय निश्चित आहे. नागपूरची लोकसभा निवडणूक फक्त नागपूरपुरतीच मर्यादीत नसून ही देशाची लढाई आहे आणि विकास ठाकरेच जिंकत असल्याचा संदेश देशभरात पोहोचत आहे. तसेच देशात इंडिया आघाडीचे सरकार निवडून येत आहे.”
इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत शनिवारी सकाळी मध्य नागपुरातील नागरिकांशी नेत्यांनी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री अनिस अहमद, बंटी शेळके, अतुल कोटेचा, किशोर पराते, श्री कांद्रिकर यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यात्रेत नागरिक स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून त्यांनी यंदा परिवर्तन घडणारच अशी हाक दिली.