आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
★ १९ उमेदवारांची यादी जाहीर !
★ मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे नागपूर लोकसभा निवडणूक लढणार
नागपूर : ( दि. ६ मार्च २०२४ ) देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु होताच अनेक राजकिय पक्ष कामाला लागले असून आप आपल्या उमेदवारांची घोषणा करू लागले आहेत. महाराष्ट्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्व प्रणालीला मानणारा आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चा यंदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरला असून एकूण १९ जागेकरीता आपल्या उमेदवारांची यांदी
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे प्रवक्ता ॲड. मिलिंद खोब्रागडे यांनी जाहीर केली.
यात नागपूर लोकसभा मतदार संघातून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे हे निवडणूक लढणार आहेत.
तर रामटेक लोकसभा मतदार संघामधून प्रा.रमेश दुपारे, वर्धेमधून ॲड. सुरेश शिंदे, भंडारा -गोंदिया मधून अँड. लेखराज मेश्राम, अमरावती मधून दिंगाबर भगत, यवतमाळ - वाशिम मधून नारायणराव शिंदे, रावेर मधून उद्धव तायडे, नांदेड मधून शिवाजी गच्छे, बीडमधून सय्यद सलीम, नाशिक मधून कल्पना दोंदे, धुळे मधून डॉ. श्रीकृष्ण बेडसे, परभणी मधून शिवाजी सुगंधे, पुणे मधून कविता गाडगे, मावळ येथून नरेश लोट, कल्याण मधून सुरेश सोनवणे, मध्ये दक्षिण मुंबई येथून दिलीप कदम, शिर्डी मधून सुनिता दाभाडे, साताऱ्यातून दशरथ कांबळे आणि मुंबई ईशान येथून पौर्णिमा पाईकराव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आंबेडकरी मोर्चाचे प्रवक्ते ॲड. मिलिंद खोब्रागडे यांनी यादी जाहीर केली आहे.