. प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन ऐकण्यासाठी पहिल्या दिवशीच भाविकांची गर्दी
• नागपूर, १७ ऑक्टोबर दिघोरी चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आज प्रारंभ झाला असून, प्रवचन ऐकण्यासाठी जागा मिळावी म्हणून भाविक दोन दिवसांपूर्वीच सभामंडपी उपस्थित होते.
लोकसेवा प्रतिष्ठान आणि आमदार मोहन मते मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दोन दिवस म्हणजे रविवारपासून हजारो भाविक नागपुरात दाखल झाले असून, कार्यक्रमस्थळी सभामंडपात ठाण मांडले आहे. उमरेड मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या ८० आयोजन करण्यात आले असून, दोन ते अडीच लाख भाविक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे. ५ हजार स्वयंसेवक या व्यवस्थेत आहेत. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या प्रवचनाची गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू असताना प्रवचन ऐकण्यासाठी जागा मिळेल की नाही म्हणून बाहेरगावी
पहिल्याच दिवशी १ लाखापेक्षा अधिक भाविक पोहोचले होते. दिघोरीपासून उमरेडकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. होती. प्रवचनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांतील भाविक या ठिकाणी आले आहेत. आतमध्ये जागा नसल्यामुळे अनेकांना बाहेर उभे राहून प्रवचन ऐकावे लागले. २१ ऑक्टोबरपर्यंत ही कथा चालणार आहे.