डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात वृक्षारोपण
नागपूर: (दि. ९ जुन २०२३) प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. यांच्या सयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांचे हस्ते आंब्याचे रोपटे लावून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.
या प्रसंगी रमेश सहारकर, पुरुषोत्तम भगत, सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, अंजली चिवंडे, विशेष अधिकारी, भारत मेश्राम, टापरे, उचे, सोरते, छाया बागडे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, अर्चना सातघरे, ज्योती माणके, निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, विक्रांत उसरबरसे, दिनेश सुखदेवे, गणेश बच्छे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, निलीमा मून, सपना पेंदाम, शीतल गीते, पूजा कोडापे, नुन्हारे, मंजूषा मेश्राम, हारोडे, सातपुते, डोगले, वासनिकर, बदन, लामसोगे, कळमकर, रामटेके, अवधूत, वाकोडीकर, पडाळे तसेच सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि मधील हरीष रोहणकर, अमिताव दत्ता उपस्थित होते.