डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयास शासनाने ५७६ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा इंदोरा चौकात जल्लोश”*
नागपूर: ( दि. १० डिसेंबर २०२३ ) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या संस्थेशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, इंदोरा, नागपूर येथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार, अभ्यासक्रम व ६१५ खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठीच्या अंदाज पत्रकास ५७५ कोटी ७९ लक्ष रुपयाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानिमित्याने भारतीय जनता पार्टी, उत्तर नागपूरच्या वतीने इंदोरा चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून ढोल ताशाच्या गजरात जल्लोश करण्यात आला.
या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री संजय भेंडे, गिरीश व्यास, धर्मपाल मेश्राम, डॉ. मिलिंद माने, विरेंद्र कुकरेजा, संदीप गवई, रामभाऊ आंबुलकर, गणेश कानतोडे, सुधीर जांभुळकर, सतिश सिरसवार, महेंद्र धनविजय, संजय भगत, शंकर मेश्राम, महेंद्र प्रधान, राजेश हाथीबेड, रुणाल चव्हाण, डॉ. सरिता माने, प्रमिला मथरानी, रंजना बन्सोड, आशा गुप्ता, रंजना रंगारी, मोहिनी रामटेके, लिना सोमकुवर, सीमा मेश्राम, वैशाली साखरे, राखी मानवटकर, उषाकिरण शर्मा, राजेश बटवानी, अमित पांडे, कमल मुलचंदानी, संजय तरारे, नेताजी गजभिये, दिलीप गौर, गुरमीत सिंग, संजय चौधरी, रमेश वानखेडे, अविनाश धमगाये, आशिष मिश्रा, अनिल झोडे, अजय कोकाटे, बंडु पारवे, दिनेश कुकडे, अजिंक्य सहारे, दिनेश इलमे, विशाल साखरे, आनंद अंबादे, स्वपनील भालेराव, संजय चावरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरच्या विकासाची १९ वर्षे वाया घालवलीत
उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलींद माने यांनी सांगितले की, आमदार व माजी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरच्या विकासाची १९ वर्षे वाया घालवलीत. मंत्री व सरकारमध्ये असतांना सुद्धा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासाठी निधी आणला नाही. आता सरकार गेल्यावर त्यांना जाग आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथून हलविण्याचा शासनाचा कोणताही विचार नसतांना जनतेची दिशाभूल करुन रुग्णालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. वास्तविक पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणून त्यांनी हे नौटंकी सुरु केली आहे. आता शासनाने निधी देऊन आहे त्या जागीच रुग्णालय उभारण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानतो.”