आंदोलनाचे अवैद्य मंडप व होर्डीग हटवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
★ वानाडोंगरी नगरपरिषद कार्यालया समोर तणाव
हिंगणा : ( दि. २० मार्च २०२४ ) लोकसभा निवडणूकीची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली. त्या अनुसंगाने स्थानिक प्रशासनाला त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार रविवार १७ मार्च राेजी दुपारी २ वाजताच्या सुमारास वानाडोंगरी नगर परिषदेचे अधिकारी अजय वाघमारे हे आपल्या कर्मचाऱ्यासह हिंगणा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी नगरपरिषद कार्यालया समोर वानाडोंगरी शहर सघंर्ष समिती तर्फ विविध मागण्याकरीता अवैद्य रित्या मंडप टाकून व होर्डीग लावून बेमुदत साखळी उपोषण करीत असललेल्या ठिकाणी पोहचून येथील अवैद्य मंडप व होर्डीग हटवित असतांना याला आंदोलनकर्त्यानी जोरदार विरोध करीत कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याची माहिती वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जैन यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्याना समजविण्याचा प्रयत्न केला