कस्तुरचंद पार्कवर रावण दहन मंगळवारी
७२ व्या दसरा महोत्सवाचे आयोजन
नागपूर : सनातन धर्म युवक सभेतर्फे मंगळवारी २४ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता ७२ व्या दसरा महोत्सवाचे आयोजन कस्तुरचंद पार्कवर करण्यात असून सांयकाळी ७ वाजता रावण दहन करण्यात येणार आल्याची माहिती अध्यक्ष प्राणनाथ साहनी यांनी पत्रपरिषदेत दिली.
या सोहळ्यात प्रारंभी रावण, कुंभकर्ण व मेघनाथ यांच्या महाकाय पुतळ्याचे पूजन होईल. यानंतर रास गरबा, ढोल ताशा वादन, उत्तर रामायणातील काही प्रसंगांवर प्रकाश शो होईल. खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि विश्व ममत्व फाऊंडेशनतर्फे ट्रान्सजेंडर ग्रुपचे सादरीकरण होईल
याशिवाय रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळेले. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र सतीजा व आर.जे. फरहान करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रवीण दटके, नरेश सेठ, सुनील डोगर, परिणय फुके, अजय संचेती, मितेश भांगडिया, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, निशांत गांधी, उर्मिला अग्रवाल, नितीन खारा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी योगराज साहनी, विजय खेर, संजीव कपूर, नरेंद्र सतेजा, मिलन साहनी, गोपाल साहनी, विनय ओबेरॉय, निर्मल दुदानी, प्रशांत साहनी, हेमंत साहनी, बलराज साहनी, आशीष धवन, विनय सेहगल, गुलशन साहनी, सुरेंद्र साहनी, ओमप्रकाश खत्री, सुधीर कपूर, अनिल साहनी, गौतम साहनी, राजेश खत्री, कपिल साहनी, सतीश खट्टर परिश्रम घेत आहे.