व्हियतनाम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा स्थापित
गगन मलिक फाउंडेशनचा परिश्रमास आले यश
नागपूर : ( दि.१८ जुन २०२३ ) व्हियतनाम येथील दी, बुद्धिस्ट टुडे सोसायटीच्या विद्यमाने व्हियतनाम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. व्हियतनाम येथील बुद्धिस्ट यूनिव्हर्सिटीच्या प्रांगणात हा पहिला पुतळा उभारला आहे. याची संकल्पना गगन मलिक फाउंडेशनची होती. यासाठी फाउंडेशन अध्यक्ष गगन मलिक परिश्रम घेत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे वेळी दि. बुद्धिस्ट टुडे सोसायटीचे अध्यक्ष पूज्य भदंत थिक नाथहन टू, गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष गगन मलिक यांच्यासह व्हियतनाम येथील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान पूज्य भदंत थिक नाथहन टू यांनी शेकडो श्रामणेरांना दीक्षा दिली. ते श्रामणेरही यावेळी कार्यक्रमात सहभागी झाले होते. पूज्य भदंत थिक नाथहन टू यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अशी माहिती गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.
गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष यांचा अथक परिश्रमास यश प्राप्त झाले आहे. त्यासाठी पी. एस. खोब्रागडे, मोहन वाकोडे, स्मिता वाकडे, अनिरुद्ध दुपारे, विशाल कांबळे, गुणवंत सोनटक्के, भीमराव मेश्राम, प्रशांत ढेंगरे, रवी सवाईतूल, वर्षा मेश्राम आदींनी अभिनंदन केले.