नितीन गजभिये यांना थायलँड संयुक्त राष्ट्रसंघद्वारा आयोजित बौद्ध सम्मेलनाचें निमंत्रण
नागपूर
भगवान बुद्धांचा जिवनात वैशाख पूर्णिमा अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण याच दिवसी भगवान बुद्धाना ज्ञानप्राप्ति, महापरिनिर्वान आणि जन्म एकच तारखेला येत असतो. याचेच औवचित्त्य साधून संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे बुद्ध जयंतीनिमित्ताने प्रत्येक एका देशात यूनाटेड डे ऑफ़ वेशाक नावानी साज़रा करण्यात येत असतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी काळात अश्याप्रकारचे आयोजन झाले नाही.
यंदाच्या वर्षाचे निमंत्रण भारतीय बौद्धमहासभा कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, केंद्रिय मंत्री रामदास आठवाले, सिद्धार्थ हत्तीअंबिरे अध्यक्ष (अनुसूचित जाति विभाग कॉग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्यासह नागपुरातील बुद्धा स्पिरिचूअल पार्कचें संस्थापक, राष्ट्रीय समन्वयक गगन मलिक फ़ाउंडेशन इंडिया, तथा सदस्य अहिल्याबाई होळकर बहुदेशिय शिक्षण संस्थाचे नितीन गजभिये याना निमंत्रण प्राप्त झाले आहे. यापूर्वी व्हियतनाम आणी श्रीलंकेमध्येसुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभामध्ये संपूर्ण जगातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते विडिओ कॉन्स्फ़्रान्सद्वारे करण्यात येणार आहे.
अशी माहिती नितीन गजभिये यानी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.