मते यांनी घरोघरी फिरून मतदारांनी परत एकदा विश्वास दाखवावा
नागपूर : दक्षिण नागपूरचे भाजपाचे उमेदवार मोहन मते यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बाईक रॅली व शक्तिप्रदर्शन करण्याऐवजी थेट गृहसंपर्कावरच भर दिला. मते यांनी घरोघरी फिरून मतदारांनी परत एकदा विश्वास दाखवावा व भाजपाला मतदान करावे, असे आवाहन केले. मते यांच्या प्रचारासाठी त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघातील विविध भागांमध्ये जाऊन मते यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. जात, धर्म किंवा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मागील अडीच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या आधारावर मतदारांनी मतं. द्यावीत. माझे काम संपूर्ण वि मतदारसंघाने पाहिले आहे व सर्वच वि जाती-धर्म, समाजासाठी विकासकामे करण्यावर माझा भर राहिला.
केंद्र व राज्य सरकार अशा डबल स इंजिनच्या जोरावर दक्षिण नागपुरातीलविकासाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास मते यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिकांशी देखील संपर्क साधला. त्याप्रमाणे गृहसंपर्कावेळी अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. यावेळी भाजपा, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.