माझा शेतकरी, शेतमजूर सरकारचा लाडका कधी होईल -रमेशचंद्र बंग
★ कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
हिंगणा ( दि. २१ ऑगस्ट २०२४ ) राज्य शासनाने लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा योजना काढल्या पण या सरकारला शेतकरी शेतमजूर मात्र दिसत नाही. दिवसान दिवसा शेतकरी हा उध्वस्त होत चाललाय परंतु असा आर्थिक हवालदिल झालेला शेतकरी हा शासनाचा लाडका शेतकरी का होत नाही हा मात्र गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. सरकारमध्ये बसलेले लोक हे शेतकऱ्यांचा विचार करत नाही शेतमालाला भाव नाही. सतत होणारा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ परंतु सरकार मात्र या शेतकऱ्यांना कवडीची मदत करत नाही असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये समितीचे राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग,यांच्या विशेष उपस्थितीत अध्यक्ष बबनराव आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार विजय घोरमारे (पाटील ), जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश सातपुते (पाटील), जि.प.माजी सभापती उज्वला बोढारे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कडू, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, अनुसया सोनवणे, वैशाली काचोरे, पूर्णिमा दीक्षित, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर लेकुरवाळे, विठ्ठल मणियार, विठ्ठल घोंगडे, प्रेमलाल चौधरी,भाऊराव बोंदाडे, गुणवंत चामाटे, उमाजी चामाटे,सरला लोखंडे, अजय गायकवाड, मिलिंद काचोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आम सभेत सभापतींनी अहवाल वाचन करून वार्षिक टाळेबंद सभासदांसमोर ठेवला.
यावेळी संस्थेचे सभासद, विविध सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच संस्थेचे हितचिंतक व्यापारी प्रामुख्याने उपस्थित होते.