आशियाई साहसी जलतरणात विक्रम करणारे जयंत दुबळे यांचे नागपूरात आगमन
★ नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत
नागपूर: ( दि.१ ऑगस्ट २०२३ ) आशियाई साहसी जलतरण पटू जयंत दुबळे यांनी १८ व १९ जुलै दरम्यान इंग्लंडची जगप्रसिद्ध असलेली इंग्लंडची इंग्लिश खाडी- इंग्लंड ते फ्रान्स व फ्रान्स ते इंग्लंड असे टू वे ७० किलोमीटरचे अंतर ३१ तास २९ मिनिटांमध्ये जयंत व त्याच्या टीमने पोहून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणामध्ये अंकित केले. त्यांचे प्रथम आगमना प्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी द्रोणाचार्य अवार्डी विजय मुनीश्वर प्राचार्य डॉ. विजय दातारकर, डॉ. संभाजी भोसले , प्रा. शाम फाळके,मंगेश जी डुके, निखिलेश सावरकर, डॉ. सुरेश चांडक, ॲड. अर्चना मेंडुले, क्रीडा अधिकारी माया दुबळे, ॲड. भूमीता सावरकर, संजीव गरजे, विलास शिंदे, राहुल सलामे, सुभाष लांडे, रामेश्वर लिखार, सुशील दूरगकर, ऐश्वर्या दुबळे, प्राजक्ता दुबळे, आशिष आढाव व शेकडो जलतरणपटू, खेळाडू , क्रीडा संघटक यांनी रेल्वे स्टेशनवर ढोल ताशा सह जयंत व भारतीय संघाचे स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांचे भव्य स्वागत केले.
इंग्लिश खाडी पोहण्याची तयारी गेल्या तीन वर्षापासून सुरू होती , आज ही इंग्लिश खाडी पोहून मला अतिशय आनंद होत आहे, नागपूर मधूनही असे सागरी जलतरणपटू तयार व्हावेत, त्याकरिता मी प्रयत्नशील राहणार आहे , असे जयंतने याप्रसंगी सांगितले .
नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना ,मोहता स्पोर्ट्स अकॅडमी, भोसले व्यायाम शाळा, डॉल्फिन स्विमिंग क्लब जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग व सर्व उपस्थित त्यांचे आभार आंतरराष्ट्रीय स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी मानले.