नागपूर
02-07-2023 23:08:47
Mission Maharashtra
मोहगाव झिल्पी तलावात पाच युवकांचा बुडून मृत्यु
हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे ही दुर्घटना
नागपूर: ( दि. २ जुलैं २०२३ ) शहरापासून ३० किलो मिटर अंतरावरील मोहगाव झिल्पी तलावात बुडून रविवारी पाच युवकांचा मृत्यू झाला.
हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे ही दुर्घटना घडली. तलावात बुडून मरण पावलेल्यांमध्ये नागपूरातील पाच युवकांचा समावेश आहे. एक युवक बुडत असल्याचे पाहून त्याचे पाच मित्र एका मागे एक त्याला वाचविण्यासाठी धावले. मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस आणि बचाव पथक तलावावर पोचले. पथकाने अथक प्रयत्न करून तलावात बुडेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले. रात्रीपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. बातमी लिही पंर्यत मृतकांची ओळख पटू सकली नसल्याने पोलिसांकडून सविस्तर वृत्त कळू सकले नाही.