नागपूर
15-04-2023 13:39:26
Mission Maharashtra
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मैत्री परिवार संस्थेने वाहिली आदरांजली
नागपूर, 15 एप्रिल 2023
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमीत्य मैत्री परिवार संस्थेच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. संविधान चौकात बाबासाहेबाच्या पुतळ्याला पुष्पमाळ व पुष्प अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, संस्थेचे गडचिरोली शाखा प्रमुख निरंजन वासेकर, गंगाराम साखरकर, दत्ता शिर्के, दिलीप ठाकरे, प्रकाश रथकंठीवार, आनंद टोळ, प्रवीण पंडे, विजय जथे, रोहित हिम्मते, प्रा. अनिल यावलकर, पियुष बोईनवार, कविता बारस्कर, संजय मार्कंडेय, विश्वंभर पसारकर, सुनील अलोनी उपस्थित होते.