रमजान घोटी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न
रामटेक : ( दि. १६ जुन २०२४ ) रामटेक ताल्युक्यातील रमजान घोटी येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण-१०६ लाभार्थीनी लाभ घेतला. यात मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२१ व चष्मे करिता-८५ लाभार्थी यांनी लाभ घेतला. या शिबिरात महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच उत्तम धरांडे, उपसरपंच देविदास भलावी, ललिता कोकोडे, सुलोचना कोकोडे, रंजिता वरखडे, रामचंद्र इडपाची, विपुल टेकाम, राजेश कोकोडे, पकेश कोकोडे, शिवदास वरखडे, प्रताप वरखडे, अरविद भलावी, सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.