वन्यजीव आधारित आंतर शालेय प्रश्नमंजुषा तसेच वन्यजीव संवर्धन की विकास या विषयावर वाद- विवाद स्पर्धा संपन्न **
नागपूर: (दि. ५ ऑक्टोबर २०२३), सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी ४ ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब, नागपूर यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वन्यजीव विषयक प्रश्न मंजुषा चे आयोजन गोल्डन लिफ बँक्वेट हॉल, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषेसाठी १२ शाळेतील जवळपास ६० विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक सहभागी झाले होते.
उपक्रमाची सुरुवात सकाळी वन्यजीव आधारित फिल्म शो ने करण्यात आली. वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासक जयदीप दास आणि शिरीष भाकरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.. विद्यार्थ्यांना वन्यजीव आधारित काही प्रश्न देऊन पात्र शाळातील विद्यार्थ्यांची या प्रश्नमंजुषा साठी निवड करण्यात आली. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना रॅपिड फायर आणि चल छायाचित्र याच्या माध्यमातून वन्यजीव आधारित प्रश्न विचारण्यात आले. सदर प्रश्नमंजुषेचे व्यवस्थापन शिवांगी गर्ग वन्यजीव अभ्यासक यांच्यामार्फत तसेच रोटरी क्लब च्या इतर सदस्य यांच्याकडून करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सेंटर पॉइंट स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर नारायण विद्यालय व निरी मॉडेल स्कूल यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. या प्रश्नमंजुषा स्पर्धेस विद्यार्थ्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप क्षीरसागर, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर आणि अधिनस्त वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कैलूके तसेच श्री. तडस यांनी परिश्रम घेतले. पाचव्या दिवशी वन्यजीव संवर्धन की विकास या विषयावर वाद- विवाद स्पर्धा रामदेवबाबा इंजीनियरिंग कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध ५ महाविद्यालयांच्या २४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी नागपूर वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्रीमती श्रीलक्ष्मी ए. तसेच एस. बाला (भावसे), श्री. हरविर सिंह (भावसे), योगेंद्र सिंग (भावसे), अविनाश लोंढे (मानद वन्यजीव रक्षक), प्रा. डॉ. पांडे, प्रा. डॉ. मेहरा उपस्थित होते. सिल्लारी येथे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या दरम्यान आंतरराज्यीय समन्वय कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, यादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.