हालक्ष्मी अनसूया माता जन्मोत्सव व मंदिराचा सोहळा ५ ला
नागपूर ( दि. २ में २०२३ ) विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) यांच्या ९६ व्या जन्मदिनानिमित्त शुक्रवार ५ मे रोजी अनसूया माता मंदिर, शांती विद्या भावन परिसर, डिगडोह (देवी) हिंगणा रोड, नागपूर येथील शाळेच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.
सकाळी ११:३० वाजता छप्पनभोग व नैवद्य चढविण्यात येईल. दुपारी १.०० ते ३.०० वेदाचार्य आचार्य विवेक त्रिपाठी व रामजी त्रिपाठी यांचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ४.०० ते ६.०० जय दुर्गा भजन मंडळ, डिगडोह व ६.०० ते ७. ३० संगीतमय सुंदरकांड (वेदाचार्य विवेक त्रिपाठी) आयोजित दत्ता गणोरकर अनसूया भजन मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ७. ३० वाजता महाआरती, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. अशी माहिती दिलीप पनकुले यांनी आज पत्रकार परिपदेत दिली.
या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री मा. रमेशजी बंग, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, मा. गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर आणि बजरंगसिंह परिहार, महिला आयोग सदस्या आभा पांडे, माजी आमदार विजय घोडमारे, माजी निगम सचिव हरीष दुबे, यांना आमंत्रित केले आहे. तसेच राजाभाऊ चिटणीस, मा. प्रभाकरराव देशमुख, सरपंच सौ. इंद्रायणी काळबांडे, उपसरपंच मा. कैलासजी गिरी, सभापती उमेश सिंह राजपूत, हर्षलता गौतम मेश्राम, मंगलाताई रडके, जि. प. सदस्या सौ. रश्मी कोटगुले, श्री. सुभाष वऱ्हाडे, डॉ. रमेश पाटील, मा. गणेश धानोरकर उपस्थित राहतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.