ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने आंतर-शालेय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये १७ पदके जिंकली
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने आंतर-शालेय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये १७ पदके जिंकली
शाळेने आंतरशालेय स्पर्धेत करंडकही पटकावला
नागपूर, २३.०२.२०२३: कामाख्या शर्मा, अर्णव चव्हाण, अर्लिन सांगोळे, अयान सांगोळे यांनी नुकतेच सुयश कॉन्व्हेंट आणि ज्युनियर कॉलेज, नागपूर येथे झालेल्या आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
इयत्ता ३ री ची विद्यार्थिनी कामाख्या शर्माने २० किलोपेक्षा कमी गटात सुवर्णपदक जिंकले; अर्णव चव्हाणने ३० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले; आर्लिन सांगोलेने ४० किलोखालील गटात सुवर्णपदक जिंकले; आणि अयान सांगोळे, या इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याने २५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. यामध्ये नागपुरातील विविध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात आली.
त्यांच्या या कामगिरीचा अभिमान बाळगून, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल – नागपूरच्या प्राचार्या श्रीमती मेहनाज पटेल म्हणाल्या, “ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या खेळातील कलागुणांना सक्रियपणे पाठिंबा देतो आणि प्रोत्साहन देतो. आमच्या सर्वसमावेशक क्रीडा कार्यक्रमाच्या मदतीने, विद्यार्थी विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या कौशल्यांकडे लक्ष पुरवू शकतात. तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या आणि पदके जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.”
या सुवर्णपदकां व्यतिरीक्त ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २० किलो ते ६० किलो गटात ६ रौप्य पदके आणि ७ कांस्य पदके जिंकली.