खामल्यात सप्तशृंगी मातेचे दर्शन होणार
★ नवरात्रोत्सवाचे उद्घाटन रविवार, १५ ऑक्टोबर रोजी
नागपूर, (१२ ऑक्टोबर २०२३ ) खामला येथील सिंध माता मंडळाच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवात नाशिक येथील आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे दर्शन होणार असल्याची माहिती सिंध माता मंडळाचे सरचिटणीस प्रकाश तोतवानी यांनी दिली.
गेल्या २७ वर्षांपासून मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे उद्घाटन रविवार, १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता माजी आमदार अनिल सोले, संजय बोंडे, मोहन चौथनी आदींच्या उपस्थित केले जाणार आहेत.
अष्टमीच्या दिवशी महाराज पंडित विजय शर्मा यांच्या उपस्थितीत होमहवन होईल. मंडळाचे पदाधिकारी नारायण भोजवानी, परमानंद शंभुवानी, दौलतराम चंदवानी, राजन रामचंदानी, नंदलाल चेतवानी, दिलीप चैनानी, न्यायाधीश हेमनानी, रमेश मंगलानी, न्यायाधीश कोडवाणी, राजेश पंजवानी आदी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.