गडकरी यांच्या हस्ते ‘उत्तरायण’चे थाटात प्रकाशन
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचा उपक्रम; विशेषांकामध्ये मान्यवरांचे साहित्य*
नागपूर : ( दि. २६ ऑक्टों२०२४ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘उत्तरायण’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने या विशेषांकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, प्रा. संजय भेंडे, घनश्याम कुकरेजा, डाॅ. पिनांक दंदे, डाॅ. संजय उगेमुगे, गौरी चांद्रायण, बाळ कुळकर्णी, जयप्रकाश गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी विशेषांकाची कल्पना उत्तम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘निवृत्तीनंतर एकप्रकारचे एकाकीपण ज्येष्ठांच्या जीवनात येते. नैराश्य, मानसिक ताण अशा विविध अवस्थांमधून माणूस जातो. शिवाय वयाच्या साठ वर्षांनंतर विविध व्याधीही मागे लागतात. हे सारे सामाजिक प्रश्न आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतात. यात साहित्यिक मेजवानी मिळावी आणि ज्येष्ठांसाठी उपयुक्त अशी माहिती देखील असावी, यादृष्टीने विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ही उत्तम कल्पना आहे.’
कार्यक्रमाला डॉ. कुमार शास्त्री, डाॅ. तरूण श्रीवास्तव, डाॅ. गोविंद वर्मा, डाॅ. विनोद जैस्वाल, सुरेशबाबू अग्रवाल, सतीश मोहोड, भावनाताई ठाकर यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान समन्वय समिती सदस्य कालिंदीनी ढुमणे, अॅड. किरण मोहिते, अॅड. उषा पांडे, डाॅ. मंगला गावंडे, पुष्पाताई देशमुख, माधुरीताई पाखमोडे, गुलशन कोहली, डॉ. विणा राठोड, वंदना वारके, मिना झंझोटे, दिलीप कातरकर, सत्यनारायण राठी, डाॅ अरूण आमले, बिपीन तिवारी, मोहन पांडे, अरूण भुरे, अंगधसिंग सोलंकी, हिम्मत जोशी, मिलींद वाचनेकर, वासुदेवसिंग निकुंभ, श्रीधर नहाते, परमजीत देहिया, अभिजित नलावडे, सुरेश उरकुडे, पत्रकार अजय पांडे, व्यंगकार टीकाराम साहू, अतुल सागुळले, सोनाली घोडमारे, अविनाश झंझोटे, सचीन नुनहरे, रोशन सहारे, यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘उत्तरायण’चे डिझाईन आणि मुखपृष्ठ साकारणारे अजय रायबोले आणि मुद्रक रोहित जयस्वाल यांचा ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.