विधानभवनाच्या पायऱ्यांवर डॉ.आंबेडकर रुग्णालयाकरिता माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आंदोलन*
विधानसभा अध्यक्षांकडून माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय - डॉ. नितीन राऊत*
नागपूर, ( दि. 21 डिसेंबर 2023 )
इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी घेऊन आज राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात पोस्टर घेऊन आंदोलन केले.
सदर प्रकल्पाच्या विषयावर लक्षवेधी न लागल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी डॉ.राऊत यांनी केले.
यावेळी माध्यमांशी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत की मागील 25 दिवसा पासून रुग्णालयाच्या तात्काळ भूमीपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती द्वारे बेमुदत जनआंदोलन सदर रुग्णालया समोर सुरु आहे. मात्र राज्य सरकार कृती समितीच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र करिता 13 ऑक्टोबर 2021च्या शासन निर्णयानुसार एकूण रु.1165.65 कोटीच्या प्रस्तावाला आर्किटेक संदीप शिर्के यांनी सादर केलेल्या आराखड्यासहित मंजुरी मिळालेली होती. परंतु भाजपप्रणित शिंदे सरकारने सदर प्रकल्पा करिता रु.575.79 कोटीच्या निधीस मंजुरी देवून दिशाभूल केली असून नागरिकांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.
नागपूर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या तात्काळ भूमीपूजन आणि बांधकाम विषयाची माझी लक्षवेधी लागली नाही. हे सातत्याने सदर प्रकल्पाबाबत यावेळी अधिवेशनात घडत आले आहे, विधानभवनेत माझा हक्क डावलण्यात येत असून हा विधानसभा अध्यक्षांकडून माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय असल्याचेही यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.
पुढे बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे नविन पदव्युत्तर व अतिविशेशोपचार अभ्यासक्रम व 615 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी 575.79 कोटी रक्कमेच्या बांधकामा करिता राज्य शासनाने मंजूर केले. परंतू शासन निर्णय दिनांक 13 ऑक्टोबर 2021 नुसार बांधकामा करिता 876.28 कोटीच्या रक्कमेला मंजुरी मिळाली होती. व सदर प्रकल्पाचे बांधकाम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे करण्यास सुद्धा मान्यता दिलेली होती. अनावर्ती खर्चाची पहिल्या तीन वर्षाची वर्षनिहाय विगतवारी एकूण 876.28 कोटी आहे. त्यावर डॉ. राऊतांनी हरकतीचा मुद्दा मांडला. या प्रकल्पच्या निधीत कात्री लावून राज्य शासनाने प्रकल्पाचे महत्व कमी केल्याचाही आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केले.
*रुग्णालयापुढे 25व्या दिवशीही साखळी उपोषण सुरूच*
मागील 25 दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय समोर नागरिकांचे दररोज साखळी उपोषण सुरु आहे. परंतु राज्य सरकार आंदोलनकर्तायांच्या मागणी कडे दुर्लक्ष करिता असल्याचाही आरोप आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला. आज सकाळ पासून साखळी उपोषणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) आणि समता सैनिक दलाचे दिनेश अंडरसहारे, सचिन वर्दे, दीपक डोंगरे, लालुराम साहू, रत्नमाला गणवीर, जयश्री जनबंधु आणि प्रणिता गणवीर यांनी सहभाग घेतला. सदर प्रकल्पा मधील रु.११६५.६५ कोटी मंजूर रक्कमेत कात्री लावून रक्कम कमी करू नये. सदर प्रकल्प आर्किटेक संदीप शिर्के यांनी सादर केलेल्या आराखडानुसार उभारण्यात यावा आणि या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि बांधकाम तात्काळ सुरु करुन रुग्णालय बचाव कृती समितीचे साखडी उपोषण सोडवावे ही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.